हवामान

बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे; आठवड्याच्या शेवटी कोकणसह मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता, ‘हवामान’चा अंदाज

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण (Konkan) आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.

सध्या थंडीचा जोर असल्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. या परिस्थितीत ढगाळ वातावरण किंवा पाऊस झाला तर आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हे वातावरण चिंता वाढवणारे आहे. बाष्पयुक्त वारे येऊन ढगाळ वातावरण (Meteorology Department) निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील चार दिवस किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टी भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे तर येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यामध्ये पावसाची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे अवकाळी सरी होण्याचा अंदाज आहे.

तापमानात दिवसा वाढ होत आहे तर रात्रीच्यावेळी हवेत गारवा जाणवत आहे. आता संमिश्र वातावरणामुळे पुन्हा अवकाळी पावसाचा धोका असल्याचा अंदाज हवामानखात्याने दिला आहे. या कालावधीत कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाली आहे. काही भागासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत कोकणातील जिल्ह्यातील तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाजही हवामानखात्याने व्यक्त केला आहे. तापमानात होणाऱ्या वाढीने नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *