हवामान

Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार शक्य

Cyclone Michaung : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यात मान्सूननंतरच्या पावसानंतर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिग्जॉम चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनुकूल हवामानामुळे मंगळवारी (दि. 5) आणि बुधवारी (दि. 6) विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपासून ईशान्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किमी उंचीवर चक्री वाऱ्याची स्थिती आहे. कमी दाबाचा पट्टा या प्रणालीतून आग्नेय मध्य प्रदेशात सरकला आहे. राज्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. आज (दि. 4) राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.७ (१७.५), जळगाव २८.२(१७.८), कोल्हापूर २९.७ (२०.०), महाबळेश्वर २६.६ (१५.८), नाशिक २९.२ (१९.६), निफाड २८.० (१९.०), सांगली २९.१ (१९.१), सातारा ३०.६ (१८.०), सोलापूर ३३.०(२०.२), सांताक्रूझ ३३.३ (२३.१), डहाणू २९.४ (२२.५), रत्नागिरी ३२.४ (२२.४),

छत्रपती संभाजीनगर – (२०.०), नांदेड ३०.२ (१९.४), परभणी २९.९ (१९.२), अकोला ३०.८ (२०.१), अमरावती ३०.४ (१९.९), बुलडाणा २७.७ (१८.६), ब्रह्मपुरी ३५.० (१८.६), चंद्रपूर ३१.८(१७.४), गडचिरोली ३२.० (१८.०), गोंदिया ३०.८ (१७.५), नागपूर ३१.०(१९.८), वर्धा ३०.८(१९.४), वाशीम २८.२(१७.८), यवतमाळ ३२.० (१९.२).

महाबळेश्‍वरला नीचांकी १५.८ अंश तापमान

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान निवळताच कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम आहे. राज्याच्या काही भागात पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *