बहुजन समाज पार्टीचा ऐतिहासिक फलक अनावरण

कोल्हापूर | २६ जून २०२५
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०८ साली त्या काळातील अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या ऐतिहासिक योगदानाची दखल अखेर घेण्यात आली आहे. या सामाजिक क्रांतीच्या वास्तूच्या जिर्णोद्धारासाठी सन २००२ मध्ये बहुजन नायक मान्यवर काशीराम साहेबमहानायिका बहन कु. मायावतीजी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ₹१० लाखांचा निधी दिला होता.

या ऐतिहासिक योगदानाच्या स्मरणार्थ बहुजन समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा युनिटच्या वतीने, २६ जून २०२५ रोजी फलक उभारण्यात आला. या फलकाचे अनावरण मा. खासदार राजाराम साहेबप्रदेशाध्यक्ष मा. सुनिल डोंगरे साहेब यांच्या हस्ते, स्टेट पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

हा फलक सामाजिक इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदानाची साक्ष देणारा असून, समाजमनात त्या क्रांतीच्या स्मृती जागवणारा ठरणार आहे.

Related posts

Leave a Comment