भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडच्या फलंदाजांवर अक्षरशः वादळ उठवलं! दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने केवळ 70 धावांत 6 बळी घेतले आणि इंग्लंडची डावाची घसरण सुरू केली. त्याने जो रूट, बेन स्टोक्स यांसारख्या प्रमुख फलंदाजांना झटपट तंबूत पाठवून इंग्लंडचा डाव कोलमडला. विशेष म्हणजे, बेन स्टोक्सला त्याने पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद केलं, ज्यामुळे स्टेडियममध्ये एकच सन्नाटा पसरला.इंग्लंडची अवस्था एकवेळ 5 बाद 84 अशी झाली होती. मात्र जेमी स्मिथ (184*) आणि हॅरी ब्रूक (158) यांनी जबरदस्त झुंज देत 303 धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला 407 धावांपर्यंत नेलं. तरीसुद्धा भारताला पहिल्या डावात 180 धावांची भक्कम आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात करत इंग्लंडवर पुन्हा दडपण आणलं आहे.सिराजच्या या कामगिरीमुळे भारताच्या विजयाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
“6 विकेट्स फटाफट! इंग्लिश फलंदाजांची उडाली भंबेरी”
