भारताने एडबॅस्टन मैदानावर इतिहास रचला! दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.कर्णधार शुभमन गिलने जबरदस्त खेळी करताना सामन्यात २६९ आणि १६१ धावा ठोकल्या. गिलच्या बॅटमधून आलेल्या या खेळीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली.दुसरीकडे, गोलंदाज आकाश दीपने सामन्यात एकूण १० बळी (पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ बळी) घेत इंग्लंडच्या फलंदाजांना संधीच दिली नाही.भारताचा हा एडबॅस्टनवरील पहिलाच विजय ठरला आहे आणि मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. पुढील सामना लॉर्ड्सवर १० जुलैपासून रंगणार आहे.
भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय: शुभमन गिलचा शतकांचा डोंगर, आकाश दीपचे १० बळी!
