सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नागपूर आणिसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालक मा. विजयकुमार दहाट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०६/०७/२०२५ रोजी साहिल सभागृह खापरखेडा येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये एकूण २४ जोडप्यांचा सहभाग होता त्यापैकी १४ अनुसूचित जातीची आणि १० आंतरजातीय जोडपी होती. त्यामध्ये मुस्लिम , ख्रिश्चन तसेच इतर जातीच्या जोडप्यांचाही समावेश होता. या सामूहिक विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मातील जोडप्यांनी बौद्ध पद्धतीने विवाह लावण्यास स्वखुशीने सहमती दिली.




सदर कार्यक्रम बहुजन समाज पार्टीच्या वतीने घेण्यात आला.या कार्यक्रमात नागपूर जिल्हा अध्यक्ष मा. योगेश जी लांजेवार, प्रभारी मा.राजकुमार बोरकर, प्रभारी मा.तपेश पाटिल, महासचिव मा.चंद्रशेखर कांबळे, कोषाध्यक्ष मा. उमेश जी मेश्राम, प्डिया प्रभारी मा.उत्तम शेवाडे हे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ता मा .भाऊसाहेब बोरकर, अमरचंदजी जैन, BVF संयोजक रामकुमार गोणेकर इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नागपूर जिल्हा प्रभारी सावनेर विधानसभा इन्चार्ज ताराबाई गौरखेडे, कामठी विधानसभा अध्यक्ष मा. चंद्रगुप्त रंगारी, रंजनाताई घरडे , माधुरी मेश्राम, महिला विंग उपाध्यक्ष नागपूर साधनाताई काटकर, बबन जी वासनिक, रामभाऊ कुर्वे, मोनाली ताई रंगारी, वत्सलाताई बनसोड,आसावरीताई गौरखेडे, प्रियाताई धोपेकर, पुष्पाताई मून, राहुल निखाडे, सुनील बारमाटे, सुशांत बोरकर यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा हर्षोल्हासा मध्ये पार पडला.
या कार्यक्रमाची लग्नविधी सावनेर विधानसभा महासचिव मा .जगदीश जी शेंडे आणि विद्याताई शेंडे यांनी पार पाडली. सावनेर विधानसभा प्रभारी उत्तम जी गजभिये ,सोनटक्के सर, उपाध्यक्ष सुधाकरजी खांडेकर, नागोराव मेश्राम, डॉ. गणवीर साहेब, राजेंद्र जी मेश्राम , अरविंद ढोरे, लांजेवार सर ,असे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. हा सोहळा बौद्ध उपासक उपासिका व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.