जैन समाजाला एक आक्रमक व सशक्त संघटनेची आवश्यकता : संदीप भंडारी

राष्ट्रीय जैन सेनेच्या कोंढवा शाखेचे भव्य उद्घाटन

पुणे : जैन धर्मामध्ये अनेक संस्था व संघटना कार्यरत असताना सुद्धा, सध्याच्या सामाजिक व सांस्कृतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, जैन समाजाला एक आक्रमक व सशक्त संघटनेची आवश्यकता आहे. हे भान ठेवत, जैन समाजाच्या सर्वांगीण रक्षणासाठी – जैन साधुसंत, संस्कृती, तीर्थक्षेत्र आणि श्रावक यांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय जैन सेना ही प्रभावी संघटना ललित गांधी यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली आहे.

याच राष्ट्रीय जैन सेनेच्या कोंढवा शाखेचे उद्घाटन क्रांतिकारी संत विराग सागर जी महाराज यांच्या पावन हस्ते शांतीनगर, कोंढवा येथे संपन्न झाले.

या प्रसंगी राष्ट्रीय उपप्रमुख संदीप भंडारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आज जैन समाजावर होणाऱ्या विविध आघातांचा विचार करता, आता वेळ आली आहे की संघटित होऊन समाजहितासाठी ‘जशास तसे’ उत्तर देणारी प्रभावी संघटना उभी राहावी. राष्ट्रीय जैन सेना ही त्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे.”

या कार्यक्रमात शाखाप्रमुख – राजेश सालेचा उपप्रमुख – मिथुन पालरेचा, सहप्रमुख – आशिष कटारिया, संजय चोपडा, विपुल राय गांधी यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन प्रीतम जैन, मयूर सरनोत, अभिजीत शहा, श्रीमल बेदमुथा, प्रमोद छाजेड आणि विनोद सोलंकी यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

कार्यक्रमाला स्थानिक समाजबांधवांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग लाभला, आणि आगामी काळात कोंढवा शाखा जैन समाजासाठी रचनात्मक आणि रक्षणात्मक कार्यात पुढे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related posts

Leave a Comment