maharashtra News

Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

Ratan Tata Helped 21 year Old Man: अर्जुन देशपांडे यांचे नाव देशातील अशा यशस्वी उद्योगपतींच्या यादीत येते ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 500 कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी लोकांना स्वस्तात औषधे देण्यासाठी त्यांनी ‘जेनेरिक आधार’ नावाची कंपनी सुरू केली.

मुंबईमध्ये असणाऱ्या या स्टार्टअपला मदत करण्यासाठी रतन टाटा पुढे आले. आज देशभरात ‘जेनेरिक आधार’च्या अनेक फ्रँचायझींची चेन आहे. या कंपनीच्या माध्यमातून लोकांना 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त औषधे मिळत आहेत.

रतन टाटा यांनी केली मदत:

स्वस्तात औषधे विकणाऱ्या अर्जुन देशपांडे यांच्या ‘जेनेरिक आधार’ कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी ग्राहक आणि कंपनीतील मध्यस्थांना काढून टाकले आहे.

त्यामुळे औषधांच्या किंमतीत घट झाली आहे. 110 रुपये प्रति स्ट्रीपने विकले जाणारे औषध ‘जेनेरिक आधार’मध्ये केवळ 5 रुपये प्रति स्ट्रिपने विकले जात आहे.

स्वस्तात औषधे विकल्यामुळे देशपांडेंची ही कंपनी काही दिवसांतच अनेक शहरात पोहचली. यानंतर देशपांडे यांना TED Talk मध्ये येण्याची संधी मिळाली. त्यांच्या TED चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. (Arjun Deshpande)

हा व्हिडिओ पाहून रतन टाटा खूप प्रभावित झाले आणि त्यांनी या कंपनीला मदत करण्याचा निर्णय घेतला. आज रतन टाटा यांच्या मदतीने जेनेरिक आधारची देशभरात 2,000 हून अधिक स्टोअर्स आहेत. यासोबतच त्या दुकानांमधून सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळत आहे.

राष्ट्रपतींनीही केले कौतुक:

यावर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन देशपांडे यांचे कौतुक केले आणि देशवासियांना स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याचे त्यांचे पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगितले. राष्ट्रपतींनी देशपांडे यांना ‘वंडर किड ऑफ फार्मा’ असे संबोधले होते.

कंपनी भारताव्यतिरिक्त, श्रीलंका, यूएई, म्यानमार, नेपाळ, भूतान आणि बांगलादेशमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

यासोबतच कंबोडिया, दुबई आणि व्हिएतनाममध्येही लवकरच त्यांची दुकाने सुरू करणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. यासोबतच प्राण्यांच्या औषधासाठीही अनेक दुकाने सुरू करण्याचा विचार करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *