ताज्या बातम्या

अरविंद केजरीवालांनी पुन्हा घेतला ईडीशी पंगा! तिसऱ्यांदा समन्सला दाखवली केराची टोपली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंमलबजावणीच्या आरोपाला पुन्हा एकदा टोपली दाखवण्यात आली आहे. ते ईडीच्या चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहिले आहे. ईडीने त्यांना समन्स बजावले होते आणि कथित मद्या नीती घोटाळ्यात चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ईडीला चौकशीसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, परंतु त्यांनी पाठवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. विशेष म्हणजे ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत तीन वेळा नोटीस पाठवली आहे. त्यांनी तीनही वेळा हजर न राहण्याचा निर्णय घेतल्याने ईडी पुढे काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

आपच्या एका नेत्याने आरोप केलाय की, केजरीवाल यांना अटक करण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यांनी लोकसभेसाठी निवडणुकीचा प्रचार करु नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. निवडणुकीच्या आधीच नोटीस का पाठवण्यात आली. आम आदमी पक्ष लोकसभा आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका लढण्याचा प्रयत्न करत आहे.

इडीने कधी पाठवला होता समन्स

ईडीने केजरीवाल यांना २२ डिसेंबरला तिसऱ्यांदा समन्स पाठवला. त्यात ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. याआधी ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबर आणि २२ डिसेंबर रोजी समन्स पाठवून चौकशीसाठी कार्यालयात हजार राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पाठवलेले समन्स अवैध आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हणत त्यांनी दोन्ही वेळा हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *