राजकारण

Lok Sabah Election : ना मोदी, ना राहुल गांधी… एकला चलो रे! मायावतींनी सांगितलं स्वबळावर लोकसभा लढवण्याचे कारण

बसपा सुप्रीमो मायवती यांनी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची आपल्या वाढदिवसादिवशी INDIA आघाडीत सहभागी होण्यास नकार देत बसपा स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी विरोधीपक्षांची इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीए या दोन्हीना नाकारत बसपा संपूर्ण देशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवेल अशी घोषणा मायावती यांनी केली आहे.

इंडिया आघाडीचा उल्लेख करत मायावती म्हणाल्या की, आघाडी केल्याने पक्षाला फायदा कमी, नुकसानच जास्त होतं आणि आमच्या मतांची टक्केवारी देखील कमी होते सोबतच इतर पक्षांना फायदा होतो. म्हणून इतर पक्षांना बीएसपीला सोबत घेऊन निवडणूक लढवायची असते. आमचा पक्ष एकटा निवडणूक लढवून चांगले निकाल आणेल. आम्ही स्वतंत्र्य निवडणूक लढवतो कारण त्याचे सर्वोच्च नेतृत्व एका दलित व्यक्तीच्या हातात आहे. आघाडीमध्ये बीएसपीची सर्व मते आघाडीला मिळतात पण आघाडीची मते, खासकरून उच्चवर्णीयांची मते बसपाला मिळत नाहीत, असेही मायावती म्हणाल्या.

मायावती म्हणाल्या खी बसपा उत्तर प्रदेश निवडणूक एकट्यानेच लढली आहे आणि एकट्याने सरकार देखील स्थापन केले होतं. त्या म्हणाल्या की बीएसपी कोणालाच मोफत समर्थन देणार नाही, पण निवडणूका झाल्यावर युतीचा विचार केला जाऊ शकतो. मायावती म्हणाल्या की आमचा पक्ष देशात लवकरच जाहीर होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीत दलित आदिवासी, मागसवर्ग आणि अल्पसंख्यांकांच्या जोरावर निवडणुक लढवेल. यावेळी मायावती यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला.

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावर बोलताना मायावती म्हणाल्या की, मला निमंत्रण मिळालं आहे, मात्र मी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मी पक्षाच्या कामात व्यस्त आहे. मात्र जो कार्यक्रम होत आहे त्याबद्दल काही तक्रार नाही, मी त्याचे स्वागत करतो. आगामी काळात बाबरी बद्दल काही झालं तर त्याचे देखील स्वागत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *